मालवण दि प्रतिनिधी
बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने कांदळगावचे सुपुत्र कुडाळ- मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांच्या सौजन्याने कांदळगाव येथे घेण्यात आलेल्या मानाच्या जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी “सिंधुदुर्ग श्री” स्पर्धेमध्ये नगरपालिका जिम, मालवणचा व्यायामपटू बंटी सारंग हा रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी ठरला. तर बेस्ट पोजर म्हणून अमित कदम, फ्युचर जिम, फोंडा व बेस्ट इम्प्रुव्ह म्हणून गणेश सातार्डेकर नगरपालिका जिम, मालवण याची निवड करण्यात आली. सावंतवाडी येथील सौरभ वारंग पुरस्कृत बेस्ट लेग-अमित कदम, बेस्ट चेस्ट- बंटी सारंग, आणि बेस्ट बॅक- गणेश सातार्डेकर यांनी सन्मान चिन्ह मिळवली.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक तथा मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. दीपक परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक, श्री. संदीप परब, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री. दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सौ.दीपलक्ष्मी पडते, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष श्री. अशोक सावंत, मालवणच्या सौ शिल्पा खोत, कांदळगाव सरपंच श्री. रणजित परब, उपसरपंच श्री. राजेंद्र कदम, सदस्य श्री. संतोष पारकर, श्री. विहार कोदे, सौ. शारदा मुळये. बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. उमेश कोदे, राष्ट्रीय पंच श्री सुनील शेगडे, श्री. किशोर सोन्सुरकर, केंद्र प्रमुख तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रशांत पारकर, रामेश्वर देवस्थानचे सचिव श्री. संतोष परब, मालवण पं. स. सदस्य श्री दीपक चव्हाण, श्री.विनायक बाईत, श्री. बबन शिंदे, संग्राम साळस्कर, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू खेळाडू श्री.अफरोज खान, संतान फर्नांडिस, श्री.दाजी सावजी, श्री. संतोष पालव, ओझर विद्यामंदिर शालेय समितीचे अध्यक्ष श्री. किशोर नरे, सौ. पूजा देविदास वेरलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-
५० ते ५० किलो वजनी गट- प्रथम क्रमांक- प्रथमेश पारकर, मसल फिटनेस, कुडाळ, द्वितीय- अंकित जाधव कुटाळकर फिटनेस, सावंतवाडी, तृतीय- अथर्व तेली पावर हाऊस जिम, कणकवली, चतुर्थ-अमोल तेली, सरवंजे फिटनेस, फोंडा, पंचम- प्रथमेश वाघमारे, पावर हाऊस जिम, कणकवली.
५५ ते ६० किलो वजनी गट-
प्रथम- भूषण गवंडी, फोर्ज फिटनेस, शिरोडा, द्वितीय- शेर बहादुर भोगटे, व्ही.एम.जीम, सावंतवाडी, तृतीय- आकाश नाईक, गौतम जिम, दोडामार्ग, चतुर्थ- शुभम हळदिवे, सरवंजे फिटनेस, फोंडा, पंचम-निहाल नाईक, बेस्ट जोकर फिटनेस,सावंतवाडी.
६० ते ६५ किलो वजनी गट-
प्रथम-गणेश सातार्डेकर, नगरपालिका जीम, मालवण, द्वितीय- मंगेश घोगळे, मसल पावर जिम, सावंतवाडी, तृतीय- साई तोरस्कर, पॉवर हाऊस जिम, कणकवली, चतुर्थ- गोपाळ कुलकर्णी, एम्पायर जिम, कुडाळ, पंचम- अमोल मोदी, रॉयल फिटनेस फोंडा.
६५ ते ७० किलो वजनी गट-
प्रथम- बंटी सारंग, नगरपालिका जीम, मालवण, द्वितीय -बाळा नार्वेकर, एम्पायर जिम, कुडाळ तृतीय- ओंकार बांदकर, नगरपालिका जीम, मालवण, चतुर्थ- सुभाष सज्जन, गिअर अप, कुडाळ, पंचम- महेश वाळके, पावरहाऊस जिम, कणकवली.
७० किलो वरील – प्रथम- अमित कदम, फ्युचर फिटनेस, फोंडा, द्वितीय- ज्ञानेश्वर आळवे, गिअरअप जिम, कुडाळ, तृतीय- महादेव पंदारे, चतुर्थ- मनीष चव्हाण, मसल क्रिएशन मालवण, पंचम- हरिदास महाले, मसल क्रिएशन, मालवण.
सिंधुदुर्ग श्री” या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अविरत आयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, राष्ट्रीय पंच श्री.किशोर शांताराम सोन्सुरकर, बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा, कांदळगावचे अध्यक्ष श्री. उमेश कोदे, सचिव श्री. प्रवीण पारकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच श्री. सुनील शेगडे, सहाय्यक श्री. किशोर सोन्सुरकर, श्री. सुधीर हळदणकर, श्री. विक्रांत गाड, श्री. अमोल तांडेल, श्री. हेमंत नाईक व श्री. महेश परब यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. किशोर सोनसुरकर यांनी केले.







