मालवण (प्रतिनिधी)
तारकर्ली येथील श्री साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा दि. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त तारकर्ली ग्राम श्री साई मंदिर मंडळ मुंबई (रजि) यांच्यावतीने विविध धार्मिक वं सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त रविवार दि. १२ रोजी सकाळी ८ वाजता साई पादुका अभिषेक, सकाळी ९ ते २ महिला लहान मुले यांचे विविध क्रीडा स्पर्धा आणि बॉडी चेक, रात्री ८ : ३० वा. दर्यावर्दी कला क्रीडा भजन मंडळ तारकर्ली यांचे भजन, सोमवार दि. १३ रोजी सकाळी ८ वा. साई पादुका अभिषेक, संध्याकाळी ४:३० वा. गावातून पालखी मिरवणूक, रात्री ७:३० वा. साईंची आरती, रात्री ८ वा. झुंझार भजन मंडळ तारकर्ली यांचे भजन, रात्री ९:३० वा. गावातील मुलांचे रेकॉर्ड डान्स, दि. १४ रोजी सकाळी ८ वा. साई पादुका अभिषेक, सकाळी ९ ते १२ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. साईंची आरती, दुपारी १२:३० साईंचा भंडारा, संध्याकाळी ५ वा. श्री महापुरुष महिला भजन मंडळ खालची वाडी यांचे भजन, संध्याकाळी ६:३० वा. श्री महापुरुष महिला भजन मंडळ वरचीवाडी तारकर्ली यांचे भजन, रात्री ७ :३० वाजता महाआरती रात्री ९:३० वाजता दोन महिला संघात जंगी डबलं भजनबारी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







