मालवण दि प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संजीवनी सेवा ट्रस्ट संचलित ‘आनंदाश्रय’ वृद्धाश्रमात एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे गरजू व ज्येष्ठ नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत त्यांना सन्मानाने भोजन देण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व संवेदनशीलतेचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.







