मालवण (प्रतिनिधी)
वायरी येथील न्यू उभाटकर निशाणकाठी महापुरुष मित्रमंडळातर्फे दि. ११ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने रात्री ९.३० वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ, नेरुर यांचा ट्रिक्ससिन युक्त ‘जोगुलांबा’ अर्थात ‘कालसर्प भेटवी’ हा रंगतदार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
परंपरागत दशावतार नाट्यकलेचा आस्वाद घेण्याची ही एक उत्तम संधी असून, या नाट्यप्रयोगात नेत्रदीपक दृश्यरचना, प्रभावी अभिनय आणि आधुनिक तंत्राचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
तरी परिसरातील नाट्यप्रेमी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







