मालवण (प्रतिनिधी)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मालवण तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सायं. ४ वा. पंचशील धम्म ध्वजारोहण व धम्म वंदना, सायं. ४:३० वा. भीम गीत गायन, सायं. ६ वा. जाहीर सभा, रात्री ८ ते १० वा. गाव शाखा सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष रविकांत कदम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कणकवली येथील कवी व स्तंभलेखक अजय कांडर, प्रमुख अतिथी म्हणून बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे विश्वस्त दिपक भोगटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







