सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय, सामुदायिक स्वयंपाकघरे आदी) कळविण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण 50 टक्के वाटपातून पात्र ठरण्यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) संस्थेकडे पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबतचे निर्देश पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या दि. 27 मार्च 2026 च्या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
PNG जोडणीसाठी इच्छुक ग्राहकांनी खालील पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा: संपर्क क्रमांक : 7588090505 / 9890743547 ई-मेल : crmsindhudurg@mngl.in
तरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी वरील पत्त्यावर PNG जोडणीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.







