मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन, कट्टा वराड (समादेवी चौक) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी महापुरुष पार कट्टा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक भजनांचा कार्यक्रमही होणार आहे.
रात्री ८.३० वाजता देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव सावंतवाडी यांच्याकडून ‘यक्ष मोहिनी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.







