मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. मेघा उपेंद्र गावकर यांच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. परिसरात होत असलेल्या सभांना आणि भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावकर यांच्या प्रचाराचा अक्षरशः झंझावात प्रभागात पाहायला मिळत आहे.
मेघा गावकर यांची विकासाभिमुख दृष्टी, पारदर्शक कामकाजाची शैली आणि जनतेशी सतत संवाद ठेवणारी कार्यपद्धती यामुळे त्यांना व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील विविध प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे—
🔸 शहरातील पायाभूत सुविधांची मजबुती
🔸 स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित मालवण
🔸 पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि रस्ताविकास यांना प्राधान्य
🔸 पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांना चालना
🔸 महिलांसाठी सुरक्षित व प्रोत्साहनपर उपक्रम
🔸 युवकांसाठी रोजगार संधी व क्रीडा विकास
“विकासाला गती, सेवेला प्राधान्य आणि शहराला नवी उंची” हे शिवसेनेचे वचन पुढे नेत, मेघा गावकर यांनी नागरिकांच्या अपेक्षांना भिडणारा प्रचार केला आहे.
“मालवणच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचे एक मत महत्त्वाचे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.







