Two scuba divers from Malvan successfully recovered a gold chain that fell into the Warna River in Sangli district, earning appreciation for their honesty and bravery.
वारणा नदीत मध्ये पडलेली सोन्याची चैन मालवणच्या स्कुबा डायव्हर्सनी शोधून काढत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. सांगली जिल्ह्यात कणेगाव येथे घडलेल्या या घटनेत मालवणचे स्कुबा डायव्हर वैभव खोबरेकर आणि सुजित मोंडकर यांनी नदीत शोधमोहीम राबवत सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन शोधून संबंधित पर्यटकाकडे सुपूर्द केली.
मिळालेली चैन परत मिळाल्याने त्या पर्यटकांनी दोन्ही स्कुबा डायव्हर्सचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
पर्यटकाची चैन नदीत पडली
पनवेल येथील काही मित्रांचा समूह फिरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे आला होता. या मित्रमंडळींपैकी काहीजण वारणा नदीत पोहण्यासाठी गेले असताना एका तरुणाची अंदाजे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन नदीपात्रात पडली.
स्कुबा डायव्हिंगद्वारे शोधमोहीम
चैन शोधण्यासाठी पर्यटकांनी मालवणमधील स्कुबा डायव्हर्स वैभव खोबरेकर आणि सुजित मोंडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगली जिल्ह्यात जाऊन स्कुबा डायव्हिंगच्या सहाय्याने नदीत शोधमोहीम सुरू केली.
काही वेळाच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही नदीपात्रात पडलेली सोन्याची चैन शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी ती चैन त्या तरुणाकडे सुपूर्द केली.
प्रामाणिक कामगिरीचे कौतुक
खोबरेकर आणि मोंडकर यांच्या धाडसी व प्रामाणिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या वेळी मदत करून त्यांनी समाजासमोर प्रामाणिकतेचे उदाहरण ठेवले आहे.



