मालवण (प्रतिनिधी):
मालवण गटस्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
पेन्शनधारकांच्या विविध अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली असून संबंधित पेन्शनधारकांनी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.






