मालवण दि प्रतिनिधी :
आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठया उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री तथा शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.
मालवण येथील आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय येथे दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, गटनेते छोटू ठाकूर, सदस्य गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण, मानसी भोगावकर, रिया बावकर यांसह उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, बाबू परब, युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, अभी लाड, विजय चव्हाण, सुनील घाडीगावकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले मागील दहा वर्ष विकासापासून वंचित असलेला मालवण कुडाळ मतदार संघ आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जनतेच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी आमदार निलेश राणे विधिमंडळात सातत्याने करत असून जनतेचे प्रश्न सोडवताना मोठा विकास निधीही मतदारसंघात आणत आहेत. आपल्या आक्रमक व अभ्यासपूर्ण शैलीने विधिमंडळ त्यांनी गाजवले.
प्रत्येकाला आपले आणि हक्काचे असणारे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा जनसागर उसळणार आहे त्या दृष्टीने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात होणार असल्याची माहिती दत्ता सामंत यांनी दिली.







