मालवण (प्रतिनिधी) :
मालवण शहरातील वायरी येथील अंधारी बागायतकर कंपाउंड परिसरात माडाचे झाड कोसळल्याने विद्युत वाहिनी तुटून विद्युत पोलही पडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तपस्वी मयेकर यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ वीज वितरण विभागाचे लक्ष वेधले. त्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नवीन विद्युत पोल उभारून तुटलेली वाहिनी दुरुस्त केली व वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत केला.
वेळेत कार्यवाही करून नागरिकांची गैरसोय दूर केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेवक तपस्वी मयेकर तसेच वीज कर्मचारी श्री. गावडे व अक्षय यांचे आभार व्यक्त केले.







