मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील डांगमोडे गावात श्री देव रवळनाथ प्रसन्न मंदिरात शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने देवीची विशेष पूजा, गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन गोंधळ उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर डांगमोडे येथील विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







