The sacred padukas of Shri Swami Samarth from Akkalkot will be brought to Malvan on February 15 for worship at Advocate Ulhas Kulkarni’s residence, offering devotees a special opportunity for darshan and blessings.
मालवण (प्रतिनिधी):
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथून पवित्र पादुका मालवण शहरात आणण्यात येणार आहेत. दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मालवणमधील अॅड. उल्हास कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भाविकांसाठी पादुकांचे पूजन व दर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या पूजाविधीसाठी वेदमूर्ती नितीन महाराज पुजारी (चोळप्पा महाराज यांचे वंशज) उपस्थित राहणार असून विधीवत मंत्रोच्चारात पादुकांचे पूजन संपन्न होणार आहे. या पवित्र दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार असून मालवण व परिसरातील स्वामीभक्तांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा असून या निमित्ताने भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभणार आहे. अधिकाधिक स्वामीभक्तांनी या पूजन सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. उल्हास कुलकर्णी यांनी केले आहे.







