The 90th birth anniversary of Sadguru Sadanand Mauli Maharaj will be celebrated on February 11 at Datta Mandir, Vairibandh, Malvan, with religious rituals, aarti, bhajans and maha prasad for devotees.
मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरीबांध येथे परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव सोहळा बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता परमपूज्य महाराजांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक व महापूजेद्वारे होणार आहे. दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती होईल, त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना प्रसादाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
सायंकाळी ७.१५ वाजता धूपारती होणार असून, रात्री ८ वाजता घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे (बुवा – श्री. नाना सामंत) यांचे भजन सादर होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, पेंडुर, कट्टा (बुवा – श्री. शामसुंदर आचरेकर) यांचे भजन होईल. कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता सांप्रदायिक भजनाने करण्यात येणार आहे.
या पवित्र जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व भक्तगण व माऊली परिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, पूजन व भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली परिवार, श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवणचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा बांदेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक, आध्यात्मिक वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होणार आहे.








