“Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal Sindhudurg organize a reel competition to spread awareness on Hindu Dharma protection. Participate, win cash prizes, and showcase your creativity. Deadline: 5th February.”
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने “हिंदू धर्म रक्षण जनजागृती” या विषयावर रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईमध्ये सामाजिक व धार्मिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ मिनिट ३० सेकंदांच्या आत रील तयार करून ती ५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करणे आवश्यक आहे. रील अपलोड करताना VishvaHinduParishadSindhudurg या पेजला टॅग करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये, द्वितीय पारितोषिक ७,७७७ रुपये तर तृतीय पारितोषिक ५,५५५ रुपये देण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनेता/अभिनेत्री, उत्कृष्ट बाल कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक व उत्कृष्ट निर्मिती संचालक (DOP) यांनाही विशेष गौरव केला जाणार आहे.
बक्षीस समारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते श्री भराडी देवी, आंगणवाडी जत्रेत पार पडणार असून जत्रेदरम्यान सर्व विजेत्यांच्या रील स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजकांनी कळवले आहे.
या उपक्रमामुळे तरुण पिढीत सर्जनशीलतेसोबत सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.







