मालवण प्रतिनिधी : आचरा पारवाडी येथील ब्राह्मण देव मंदिरात गुरुवार, 5 फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असून हा भक्तीमय सोहळा रविवार, 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या हरिनाम सप्ताहानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान दररोज रात्री ठीक 11.30 ते 1.00 वाजेपर्यंत ब्राह्मण देव दिंडी मंडळ, आचरा पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम सादर होणार आहे. भजन, कीर्तन, हरिनाम जप यांच्या माध्यमातून भक्तीचा जागर केला जाणार आहे. या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हरिनाम सप्ताहानिमित्त मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ब्राह्मण देव मंदिरात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर रात्री 10 वाजता श्रीदेवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, चिंचोली (सावंतवाडी) यांचा ‘धर्म विजय’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या या नाट्यप्रयोगाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ, आचरा पारवाडी यांच्या वतीने सर्व भाविक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तांनी हरिनाम सप्ताह, सत्यनारायण महापूजा व दशावतार नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन घडणार असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.







