मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इच्छुकांनी दि. १० फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी. एका व्यक्तीस एकदाच सहभाग घेता येणार असून प्रत्येक गाण्यासाठी चार मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष कुडाळी (मो. ९४०४३७३९९८) यांच्याशी संपर्क साधावा.
मुख्य वर्धापन दिनी दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री देव महापुरुषाची पूजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता सुस्वर भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री ९ वाजता अतुल मोरे प्रस्तुत श्री भवानी सिद्ध भराडी दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘गणेश महिमा’ सादर होणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्याचा भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







