मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील मालोंड सतीचा मळा येथील श्री देवी सती भवानी आईचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार, दि. ३१ जानेवारी रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व अभ्यंग स्नान, सकाळी ८ वा. होम-हवन, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा व महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम होणार असून रात्री ८ वा. भजन कार्यक्रम, रात्री ९ वा. पालखी मिरवणूक आणि रात्री १० वा. दशावतारी नाटक सादर करण्यात येणार आहे.
तरी या पवित्र जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभुकूल विस्तार संस्था, समस्त विश्वस्त व मालोंड ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







