कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पक्षीयांनी शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे शोक सभा आयोजित केली आहे.
दिवंगत अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी या नियोजित वेळेत उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.







