मालवण | प्रतिनिधी
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणती दिशा निवडावी, करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी कट्टा येथे करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१० वी नंतर काय?’ या विषयावर हे समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे होणार आहे. यावेळी सर्टिफाईड करिअर काऊन्सिलर नेहा करंदीकर – हुनारी या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रवाह, व्यावसायिक संधी, स्पर्धा परीक्षा तसेच करिअर नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
या करिअर समुपदेशन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री. दीपक भोगटे (मो. ९४२३८३३१६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, श्री. किशोर शिरोडकर, श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व श्री. शैलेश खांडाळेकर यांनी केले आहे.







