वेंगुर्ला |
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपाच्या वतीने आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला.
यावेळी भाजपचे तालुकास्तरीय नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीष दळवी यांच्या उमेदवारीमुळे आडेली मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून, या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक विकास, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मतदारांचा विश्वास मिळवण्याचा निर्धार दळवी यांनी यावेळी व्यक्त केला.







