मालवण | प्रतिनिधी
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या वतीने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.
या स्पर्धेसाठी श्रीम. रजनी ठाकूर (आचरा), कै. सुधाकर आचरेकर (आचरा), श्रीम. भावना मुणगेकर (मुंबई), श्री. प्रसाद रेडकर (मुंबई) आणि श्रीम. मिथिला नेरुरकर (पुणे) यांनी प्रायोजन केले आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकास रु. १०००, द्वितीय क्रमांकास रु. ७००, तृतीय क्रमांकास रु. ५००, तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रु. २५० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारी कविता ही स्वरचित मराठी किंवा मालवणी बोली भाषेतील असावी. कविता दीर्घ नसावी व सादरीकरणाचा कालावधी ३ ते ५ मिनिटे इतका असेल. कवितेमध्ये राजकीय विडंबन किंवा अश्लीलता नसावी. प्रत्येक स्पर्धकाला एकच कविता सादर करता येईल.
स्पर्धकांनी आपल्या कविता दि. २० फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संस्थेत जमा कराव्यात. प्रथम येणाऱ्या फक्त १५ स्पर्धकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२३६५-२४६०१७ किंवा ९४२१२६३३४६ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







