कुडाळ (प्रतिनिधी):
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक कुडाळ–मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. दत्ताजी सामंत साहेब प्रमुख उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बांधणी, मतदारसंघनिहाय तयारी, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी झराप गावचे उपसरपंच श्री. मंगेश भास्कर गावकर यांची शिवसेना मागासवर्गीय उपतालुकाप्रमुख, कुडाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे पक्षाची मागासवर्गीय संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस सौ. दीपलक्ष्मी पडते (शिवसेना महिला जिल्हाप्रमुख), संजय पडते (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), दादा साहिल (शिवसेना जिल्हा सरचिटणीस), अरविंद करलकर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), रत्नाकर जोशी (शिवसेना जिल्हाप्रवक्ते), विनायक राणे (शिवसेना तालुकाप्रमुख), स्वरूप वाळके (युवासेना उपजिल्हाप्रमुख), विजय जाधव (शिवसेना मागासवर्गीय तालुकाप्रमुख), रचना नेरुळकर (महिला तालुकाप्रमुख), नागेश आईर व वेताळ बाबर्डे (विभाग प्रमुख), अनिकेत तेंडोलकर (युवासेना तालुकाप्रमुख) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना भक्कम ताकदीने उतरून यश मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







