कणकवली (प्रतिनिधी) – कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत शिवसेनेचे सुशांत श्रीधर नाईक यांनी १० मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयाबद्दल माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सुशांत नाईक यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, दिपिका जाधव, जुई मुरकर, लुकेश कांबळे, बाळू पारकर, अनिल डेगवेकर, बंडू ठाकूर, सचिन सावंत, महेश देसाई, अवधूत मालणकर, विलास कोरगावकर, अनंत पिळणकर, प्रथमेश तेली, सौरभ पारकर, हर्षद गावडे, संजय पारकर, उमेश वाळके, तेजस राणे, सुनील पारकर, संतोष पुजारे, वैभव मालंडकर, उत्तम लोके, धिरज मेस्त्री, चंद्रहास राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुशांत नाईक यांच्या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून, शहराच्या विकासासाठी ते भक्कम भूमिका पार पाडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





