मालवण | प्रतिनिधी :
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून साळेल गावात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत साळेल नांगरभाट वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, तसेच साळेल मोगरणे रस्त्याला कुळकरवाडी महापुरुष मंदिराजवळ संरक्षक भिंत बांधणे ही कामे मंजूर झाली असून, त्यांचा अधिकृत शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी सांगितले की, शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहेत. मागील अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे तसेच जनतेच्या मागणीनुसार वाडी-वस्ती पातळीवरील विकासकामे आगामी काळात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्याने मंजूर केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, माजी जि.प. सभापती संतोष साटविलकर, साळेल सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, ग्रामपंचायत सदस्य विकी पेडणेकर, सिद्धी पवार, संपदा गावडे, समीर गावडे, ग्रामसेविका स्वरा परब यांच्यासह ग्रामस्थ गणपत पडवळ, भानजी गावडे, जयप्रकाश गावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, एकता पोफळे, श्रेया पडवळ, शिवराम गावडे, तात्या गावडे, कृष्णा गावडे, परेश गावडे, गणेश गावडे, स्वरा पडवळ, रवींद्र परब, रमेश मासये, नरेश गावडे, शाखाप्रमुख साबाजी गावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे साळेल गावातील दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.







