मालवण | प्रतिनिधी :
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर–मयेकरवाडी–पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.
या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार असून दळणवळण अधिक सुरक्षित व सोयीचे होणार आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना या रस्त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, सरपंच शाम वाक्कर, विभागप्रमुख मंदार लुडबे, मनीष पाटकर, गणेश आचरेकर, रोहन मयेकर, श्री आजगावकर, गणेश मयेकर, शामा पेडणेकर, शिवदास चव्हाण, ऋषी आचरेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देत अशा विकासकामांमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






