मालवण : प्रतिनिधी
मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीकच्या सिद्धिविनायक पटांगण येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी हा उत्सव पर्वणी ठरणार आहे.
उत्सवाची सुरुवात बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधींनी होणार असून सायंकाळी ४ वाजता गणेश आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश मूर्तीचे पूजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन तर रात्री ८ वाजता जंगी भजनबारी सामना (बुवा – श्री. दिनेश वागदेकरे विरुद्ध बुवा श्री. श्रीकांत शिरसाट) आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता महाआरती, सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन व रात्री ९ वाजता धमाल विनोदी मालवणी नाटक “बाई शिवाय लग्न” सादर होणार आहे.
शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन व रात्री ९ वाजता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ यांच्यावतीने “जलवा २०२६” हा नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे.
रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन व रात्री ९ वाजता कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन व रात्री ९ वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, दांडेली यांचा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग “दख्खनचा राजा जोतिबा माझा” सादर होणार आहे.
मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरती, सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता संगीत भजन व रात्री ९ वाजता दत्तमाउली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग “जिव्हेश्वर” सादर होणार आहे.
उत्सवाचा समारोप बुधवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद व सायंकाळी ४ वाजता गणेश विसर्जन सोहळ्याने होणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रेकोबा मित्रमंडळ व माघी गणेश उत्सव मंडळ तसेच श्री. संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे व मंदार लुडबे यांनी केले आहे.






