मालवण तालुक्यातील वायरी बांध येथे मकरसंक्रांतीनिमित्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हौशी कलाकार वायरी बांध यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचे पौराणिक नाटक ‘वस्त्रात ब्रह्मरेत जन्मास आले शिवतेज’ सादर करण्यात येणार आहे.
हा नाट्यप्रयोग बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी वायरी बांध येथील जुने दत्त मंदिर येथे रंगणार असून, पारंपरिक दशावतार कलेचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
या पौराणिक नाट्यप्रयोगास परिसरातील भाविक व नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन हौशी कलाकार वायरी बांध यांच्या वतीने करण्यात आले आहे.






