मालवण, दि. प्रतिनिधी:
मालवण येथील नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गणेश लव्हे यांचे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार लव्हे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, शहरप्रमुख बाबी जोगी, चिंतामणी मयेकर, बाळा मिटकर, दत्ता पोईपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मालवण शहरासह तालुक्यातील विविध जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, प्रलंबित कामे मार्गी लागावीत तसेच विकासकामांना गती मिळावी, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावर नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांनी सर्वांशी सकारात्मक संवाद साधत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून काम करण्याचे आश्वासन दिले.





