सावंतवाडी | प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. लोकसहभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून सावंतवाडीला आदर्श शहर बनवूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आमदार केसरकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचा कारभार अधिक गतिमान व विकासाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही नगराध्यक्षा भोसले यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.






