मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन (२०२५–२६) यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात विद्यार्थी प्राथमिक गटात आडवली हायस्कूलच्या दत्ताराम लाड याच्या ‘जीवन रक्षक प्रणाली’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. तर विद्यार्थी माध्यमिक गटात टोपीवाला हायस्कूलच्या ओम आंबेरकर याच्या ‘प्रोजेक्स एआय – ऑफलाईन, ऑनलाईन असिस्टंट’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.
विज्ञान प्रदर्शनाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे —
विद्यार्थी गट (प्राथमिक)
द्वितीय – वेदा मराठे (कट्टा हायस्कूल) – पॅडल वॉटर टँक
तृतीय – मानवी घाडीगावकर (प्रगत विद्यामंदिर, रामगड) – करूया व्यवस्थापन कचऱ्याचे
विद्यार्थी गट (माध्यमिक)
द्वितीय – ओमतेज तारी (प्रगत विद्यामंदिर, रामगड) – श्रीवाचक बहुपयोगी कलेक्टर
तृतीय – वृषभ गावकर (इं. द. वर्दम हायस्कूल) – स्मार्ट वॉटर इरिगेशन सिस्टीम
शिक्षक गट (प्राथमिक)
प्रथम – डी. एन. प्रभुगावकर (जि. प. प्रा. शाळा, रेवतळे मालवण) – मॅथ्स फन फेअर
द्वितीय – आसमा तांबोळी (जि. प. केंद्रशाळा, सुकळवाड) – मॅजिकल नंबर्स
तृतीय – बाळकृष्ण नांदोसकर (जि. प. केंद्रशाळा, सुकळवाड) – जादूई पुस्तक

शिक्षक गट (माध्यमिक)
प्रथम – विष्णू काणेकर (त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे) – चमत्कार प्रकाशाचा
द्वितीय – संदीप अवसरे (भंडारी हायस्कूल, मालवण) – न्यूटनचा गतीविषयक नियम
तृतीय – दत्तप्रसाद परुळेकर (भ. ता. चव्हाण मा. विद्यालय, चौके) – प्रेशर वॉल्युम रिलेशन
प्रयोगशाळा परिचर गट
प्रथम – विजय लिंगायत (प्रगत विद्यामंदिर, रामगड) – तंत्रदृष्टी झूम पेन
द्वितीय – संदीप धामापूरकर (शिवाजी विद्यामंदिर, काळसे) – मेंदूचे भाग व होलोग्राम
तृतीय – संजय राठोड (डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवण) – जलशुद्धीकरण
विद्यार्थी प्रतिकृती – दिव्यांग (प्राथमिक)
प्रथम – समृद्धी गुराम (प्रगत विद्यामंदिर, रामगड) – घरकामात दिव्यांगांना मदत करणारी साधने
द्वितीय – अपूर्वा राणे (भ. ता. चव्हाण विद्यालय, चौके) – वॉटर कुलर
तृतीय – पार्थ तोंडवळकर (कन्याशाळा) – स्वच्छता रक्षक
विद्यार्थी प्रतिकृती – दिव्यांग (माध्यमिक)
प्रथम – ओंकार राणे (प्रगत विद्यामंदिर, रामगड) – दिव्यांग सोबती
द्वितीय – लीना वायंगणकर (ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी) – कार्बन टू इंक
तृतीय – ओम करावडे (भ. ता. चव्हाण विद्यालय, चौके) – रेन डिटेक्टर
वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक)
प्रथम – आदित्य प्रभुगावकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल) – जलसंवर्धन काळाची गरज
द्वितीय – प्रिया पेंडूरकर (न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर) – जलसंवर्धन काळाची गरज
तृतीय – सृष्टी गावडे (जि. प. पूर्ण प्रा. शाळा, हेदूळ) – हरित ऊर्जा
वक्तृत्व स्पर्धा (माध्यमिक)
प्रथम – वेदांत नाईक (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण) – भारतीय स्थापत्य कलेतील गणित व विज्ञान
द्वितीय – पुष्पक गोलतकर (ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी) – सिंधुदुर्गातील शेती : संधी व आव्हाने
तृतीय – चित्रा परब
निबंध स्पर्धा (प्राथमिक)
प्रथम – भाग्यश्री हडकर
द्वितीय – प्रांजली घाडीगावकर
तृतीय – वंशिका खोत
निबंध स्पर्धा (माध्यमिक)
प्रथम – चैतन्य भोगले
द्वितीय – भार्गवी नांदोसकर
तृतीय – सिद्धी जाधव
प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक)
प्रथम – अमोल मालपेकर, किरण सावंत (ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी)
द्वितीय – आदित्य प्रभुगावकर, अस्मी अशोक आठलेकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण)
या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळाली असून नवोन्मेषी विचारांचे प्रभावी दर्शन घडल्याचे आयोजकांनी नमूद केले.





