महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व मालवण आगार, एसटीप्रेमी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणहून कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेत मालवण-आदमापूर बाळूमामा दर्शन, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर दर्शन, ज्योतिबा दर्शन, तुळशीवाडी दत्त दर्शन, पंढरपूर विठ्ठल दर्शन (मुक्काम) अक्कलकोट दर्शन, मालवण असा प्रवास होणार आहे. प्रवास भाडे प्रौढांसाठी १९०७ रुपये, तर मुले / महिला / ज्येष्ठ नागरिकांसाठी ९६१ रुपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास पूर्णतः मोफत असेल. (जेवण व निवासाचा खर्च स्वतंत्र.)
यात्रेसाठी ४० प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर बससेवा आपल्या गावातून उपलब्ध होणार असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. अधिक माहिती व बूकिंगसाठी संपर्क आगार व्यवस्थापक अनिकेत सूर्यवंशी-८२७५०२५४०६, स्थानकप्रमुख स्वप्नील गजरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश वाडके, लिपीक दिलीप हिंदळेकर, प्रवासीमित्र अनंत सामंत यांच्याशी संपर्क साधावा. भाविकांनी लवकर नोंदणी करून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







