उबाठा शिवसेना महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण, दि. २८ : प्रतिनिधी
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कशिश पराडकर हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. मनीषा सोनावडे यांनी द्वितीय, तर प्रांजली लाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक, त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या कशिश पराडकर हिला प्रथम क्रमांकासाठी फ्रिज, मनीषा सोनावडे यांना द्वितीय क्रमांकासाठी एअर फ्रायर, तर प्रांजली लाड हिला तृतीय क्रमांकासाठी मिक्सर देऊन गौरविण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेत अस्मि भगत प्रथम
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेलाही महिलांसह बालिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अस्मि सुधीर भगत हिने प्रथम क्रमांक पटकावला. आराध्या वसंत टेमकर हिने द्वितीय, तर सावी वसंत कांदळगावकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला महिलांच्या सहभागामुळे विशेष रंगत आली. नारळ लढविण्याच्या प्रत्येक फेरीत वाढत गेलेली चुरस आणि उपस्थितांचा उत्साह यामुळे मालवण बंदर जेटीवर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उबाठा शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, बंड्या सरमळकर, युवासेना तालुका समन्वयक, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेविका अनिता गिरकर, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, महेश जावकर, उमेश मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, उपतालुकाप्रमुख रश्मी परुळेकर, शहर संघटक राधिका मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, रूपा कुडाळकर, गौरी सावंत, स्मिता सरमळकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, सोनाली खोबरेकर, संजना रेडकर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, मनोज मोंडकर, अन्वय प्रभू, राहुल सावंत, सुधीर परब, प्रथमेश सरमळकर, बबन वाघ, आर्या गावकर, दीपा जावकर, योगिता गावकर, बाळा मिटकर, अक्षय रेवंडकर, फिलसू फर्नांडिस, सुरेश मर्ये आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन रोहन कदम आणि लारा मयेकर यांनी केले.






