महायुतीच्या महिला नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बंदर जेटीवर जल्लोष
मालवण, दि. २८ : प्रतिनिधी
नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला नारळ लढविणे स्पर्धेत मधुरा मयेकर यांनी विजेतेपद पटकावले. तर भाग्यश्री माळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. हर्षदा खुरंदळे यांनी तृतीय, संजना मेस्त्री यांनी चतुर्थ, परी सावजी यांनी पाचवा, सालिया शेख यांनी सहावा, गार्गी मोंडकर यांनी सातवा, तर संजना जुवाटकर यांनी आठवा क्रमांक मिळविला.
या आठही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मधुरा मयेकर यांना सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि फ्रिज देण्यात आला. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या भाग्यश्री माळकर यांना वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकाच्या विजेत्या हर्षदा खुरंदळे यांना चांदीचा कुंकवाचा करंडा, तर चतुर्थ क्रमांकाच्या संजना मेस्त्री यांना चांदीचा छल्ला देण्यात आला. पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी मिक्सर, तर सातव्या व आठव्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून २० स्पर्धकांना विविध बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पर्धेला महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवाला महिलांच्या सहभागामुळे विशेष रंगत आली. स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत चुरस वाढत गेल्याने बंदर जेटीवरील वातावरणात उत्साहाचे उधाण आले होते. स्पर्धकांचा जोश आणि उपस्थित प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, स्वप्नाली नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, शिवसेना महिला आघाडी संघटक तथा नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, शिवसेना तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, ललित चव्हाण, मार्टिना फर्नांडिस, प्रियांका मेस्त्री, रश्मी तुळसकर, अर्चना मिठबावकर, तारका चव्हाण, महिमा मयेकर, अमृता फाटक, अंजना सामंत, दिक्षा गावकर, दिव्या कोचरेकर, शाम वाक्कर, राजू बिडये, अखिलेश शिंदे, मनोज हडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवाला वेगळीच रंगत आली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रत्येक फेरीतील वाढती चुरस आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे मालवण बंदर जेटीवर नारळी पौर्णिमेचा उत्सव दिमाखात साजरा झाला.






