धुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या ‘संत सेवा पुरस्कार’, ‘ज्येष्ठ वारकरी पुरस्कार’ तसेच ‘ज्येष्ठ कीर्तनकार पुरस्कार’ यासाठी २०२५ सालाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायात सातत्याने सेवा, साधना आणि संस्कार परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे सन्मान दिले जातात.
या वर्षी जेष्ठ मृदूंगमणीसाठी वय ६५ वर्षे पूर्ण असलेल्या दोन जेष्ठ वारकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच ८० वर्षे पूर्ण असलेल्या एक जेष्ठ वारकरी व्यक्तीस स्वतंत्र पुरस्कार दिला जाणार आहे. अर्जदार हा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सभासद असणे अत्यावश्यक आहे.
इच्छुकांनी आवश्यक पुराव्यांसह आपले अर्ज १८ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी 2025 चे वरील पुरस्कार बाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडे अर्ज करण्यासाठी विश्वनाथ कृष्णा गवंडळकर – 9420261934, गणपत विश्राम घाडीगावकर -9623884116, तसेच पत्र व्यवहार – श्री. मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली, या पत्यावर दिनांक 18 डिसेंबर 20 25 पर्यंत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहेत.






