गुर्ले एस.टी. डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, वेंगुर्ला आगार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व सेवा शक्ति संघर्ष संघाचे वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री मिलिंद मयेकर, श्री वैभव मांजरेकर, श्री नांदोस्कर, श्री मचे तसेच इतर सभासद उपस्थित होते.
यावेळी आगारातील विविध समस्या तसेच स्थानिक प्रवासी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन नवनियुक्त आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून वेंगुर्ला आगारात नव्या व्यवस्थापनाच्या कार्यकाळाची सकारात्मक सुरुवात झाली.







