संत परंपरेतील समाजप्रबोधनकर्ते संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती चौके ग्रामपंचायत कार्यालयात श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी सरपंच पी. के. चौकेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर, सदस्य श्री. दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, माजी सरपंच सचिन आंबेरकर, ज्येष्ठ नागरिक बबन आंबेरकर, प्रभाकर गावडे, तेली समाज उन्नती मंडळाचे श्री. सुनील आंबेरकर, सौ. सुचिता सुनील आंबेरकर, हनुमंत आंबेकर, लिपिक सौ. सुविधा गावडे, मेघा वराडकर, कर्मचारी आनंद सावंत, गुरूप्रसाद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संताजी महाराजांच्या सामाजिक कार्याची, भक्ती चळवळीतील योगदानाची तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनमूल्यांची आठवण करून देण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली.







