इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100% गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली चौकुळची सुकन्या कु. भार्गवी अंकुश शेटवे हिला चौकुळ ग्रामपंचायतने दिला ध्वजारोहणाचा मान.
सावंतवाडी प्रतिनिधी : 80 व्या स्वातंत्र्यदिनी चौकुळ ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100% गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली चौकुळची सुकन्या कु. भार्गवी अंकुश शेटवे हिला देण्यात आला. तसेच ग्रामपंचायतकडुन तिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कु.भार्गवीचे पणजोबा, आजोबा, व वडील हे आर्मीत सेवानिवृत्त असल्याने तिलाही संरक्षण क्षेत्रात करियर करायचे आहे. चौकुळ ग्रामपंचायतने ध्वजारोहणाचा मान कु भार्गवी हिला देऊन शिक्षणाला ग्रामपंचायतने सर्वोच्च प्राधान्य देत आदर्श घालुन दिला.
यावेळी चौकुळचे प्रशासक गुलाबराव गावडे, सर्व प्रशासकीय समिती सदस्य , ग्रामपंचायत अधिकारी अमीत राऊळ, जेष्ठ शिक्षक गावडेसर, चेअरमन पांडुरंग गावडे , माजी सैनिक, ग्रामपंचायत प्राधिकरणातील सर्व कर्मचारीवर्ग, पोलीस पाटील इ. उपस्थित होते






