छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने समृद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील नांदोस गावात ऐतिहासिक गढीच्या पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ ७ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षे ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टामधून संवर्धन केलेल्या या गढीच्या उत्खननासाठी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आदरणीय आशिषजी शेलार यांनी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून इतिहास पुनर्जीवित करण्याचा मार्ग खुला केला आहे.
या भव्य सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. विद्यार्थिनी कु. ममता महेश आंगगचेकर (इ.१२वी) हिने स्वतः रेखाटलेली छत्रपती शिवरायांची आकर्षक प्रतिमा मंत्री आशिष शेलार यांना भेट दिली. तसेच ललित दिलीप मिस्त्री (इ.७ वी) व त्यांच्या पालकांनी लाकडातील सुबक शिवराय प्रतिमा आमदार माननीय निलेशजी राणे यांना भेट स्वरूपात अर्पण केली.
यावेळी नांदोस गढीचा इतिहास उलगडणारा विशेष लेख असलेला वराडकर हायस्कूल कट्टाचा वार्षिकांक ‘वंदना’ सर्व मान्यवरांना प्रदान करण्यात आला.
सोहळ्याच्या व्यासपीठावर मंत्री आशिषजी शेलार, आमदार निलेशजी राणे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, डॉ. विलास वाहने, भाजपचे जिल्हा पदाधिकारी, नांदोस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. विजय निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर स्काऊट–गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वराडकर हायस्कूल कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, उपाध्यक्ष श्री. आनंद वराडकर, श्री. शेखर पेणकर, सचिव श्री. सुनील नाईक, सहसचिव श्रीमती विजयश्री देसाई, श्री. एस. डी. गावडे, खजिनदार श्री. रवींद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
नांदोस गढीचा उत्खनन सोहळा विद्यार्थ्यांसाठी इतिहास, संस्कृती आणि स्वराज्यपरंपरेचा जवळून अनुभव देणारा ठरला.






