कांदळगाव–कातवड (प्रतिनिधी) : कांदळगाव–कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवालय सभागृहाचा १७ वा वर्धापन दिन आणि हरीनाम सप्ताह यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागात पारंपरिक संस्कृती आणि अध्यात्माचा संगम अनुभवण्याची संधी यातून मिळणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा :
९ डिसेंबर
• सकाळी ८ वा. – विधिवत पूजा
• सकाळी १० वा. – लघुरुद्र, होम
• दुपारी १ वा. – महाआरती
• दुपारी १.३० वा. – महाप्रसाद
• दुपारी ३ वा. – सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद
• सायं. ७ वा. – स्थानिक भजने
• रात्री १० वा. – कातवड वाडीतील कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम
११ डिसेंबर
• सकाळी ८ वा. – हरीनाम सप्ताह प्रारंभ
१२ डिसेंबर
• सकाळी ८ वा. – हरीनाम सप्ताह समाप्ती
• दुपारी २ वा. – ब्राह्मण भोजन
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कातवड वाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







