२०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
या योजनेसाठी १२ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जासाठी hmasnew.mahait.org संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची एक प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.






