सिंधुदुर्गनगरी, दि. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन २०२६ करिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी जारी केली आहे.
जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी, १८ सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन आणि ९ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या तीन दिवसांना स्थानिक सुट्टी राहणार आहे.
या स्थानिक सुट्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांना लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
२०२६ मधील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानिक सुट्ट्या :
- १७ ऑगस्ट – नागपंचमी
- १८ सप्टेंबर – ज्येष्ठागौरी पूजन
- ९ नोव्हेंबर – धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती)






