भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवणमध्ये आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फुले–शाहू–आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने हा कार्यक्रम दि. ६ डिसेंबर रोजी पार पडणार असून विविध उपक्रमांद्वारे महामानवाला आदरांजली वाहिली जाणार आहे.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणून भीम ज्योत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. ही मिरवणूक
सायंकाळी ७ वा. मालवण एसटी बस स्थानक मागील समाज मंदिरातून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा येथे विसर्जित होईल.
महामानवाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाचे मूल्य दृढ करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फुले–शाहू–आंबेडकर विचार मंचतर्फे करण्यात आले आहे.







