सिंधुदुर्गनगरी
: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (22 जुलै) आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ होणार असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अरविंद मोंडकर यांनी केले आहे.







