सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंड्याची यात्रा म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवात काल गुरुवारी रात्री भक्तांचा महापूर लोटला. आज दुसऱ्या दिवशीही भाविकांनी श्री देवी भगवती माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती
नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवाला कालपासून प्रारंभ झाला असून शनिवारी सकाळी विधिवत पूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने गाऱ्हाणे (साकडे) घालून यात्रोत्सवाला सुरुवात झाली भाविकांनी दुपार पर्यंत नवस फेडणे, माहेरवाशीनीची ओठी भरणे, दर्शनासाठी भक्ताच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या.
दुपार पासून गर्दी आणखीनच वाढत गेली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास देव डाळपस्वारी भगवती माऊली मंदिरात असंख्य भाविक भक्तांन सह फटाक्याच्या आतषबाजीत, ढोल, ताश्यासह “हर हर महादेवच्या गजरात” दाखल झाली. त्या नंतर पुराण वाचन व महाराष्ट्रात भगवती माऊली यात्रा प्रसिद्ध असलेलं दिंडे नृत्य ‘आई उदो गं उदोच्या’ जयघोषात भक्तीमय वातावरणात साजरा झाला. गोंधळ, कीर्तन व आरतीने यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची समाप्ती झाली.
आज दुसऱ्या दिवशीही भाविकांनी श्री देवी भगवती माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती







