मालवण, प्रतिनिधी :
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनन्या अनिल पाटकर आणि मानसी संतोष बांदिवडेकर या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.
या यशासाठी विद्यार्थिनींना शिक्षक मिलिंद शिरोडकर, दर्शना सामंत आणि मयुरा भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या दोन्ही विद्यार्थिनींनी हे यश मिळविल्याचे सांगण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थिनींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







