मालवण (प्रतिनिधी):
मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा उद्देश असून, परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







