मालवण : प्रतिनिधी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग आणि मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू आरोग्य मेळावा’ मसुरे येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले की, असे आरोग्य मेळावे खऱ्या अर्थाने रुग्णसेवा करणारे उपक्रम असून प्रत्येक गावात आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असे मेळावे आयोजित झाल्यास शासनाचा आरोग्यविषयक उद्देश सफल होईल. ग्रामस्थांनीही अशा उपक्रमांचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुधारावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, संजय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
मेळाव्यात हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, शल्यचिकित्सा, ईसीजी, एनसीडी तपासणी, एचपीव्ही लसीकरण, पीएमजेएवाय कार्ड आदी विविध विभागांतर्गत तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 205 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार व औषधोपचार देण्यात आले.
यावेळी मसुरे जि प सदस्य क्षमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समिती सदस्या श्रीमती योजना कांबळी, श्री संजय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील, डॉ. सायली मिठारी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी या आरोग्य मेळाव्या विषयी माहिती देऊन शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचीही माहिती उपस्थित रुग्णांना देऊन शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी केले.
यावेळी मसुरे जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर यांनी ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुखकर आणि समृद्ध होण्यासाठी असे आरोग्य मिळावे होणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी अतिशय चांगला असा उपक्रम राबवला असून सर्व आरोग्य विभागाचे या निमित्ताने आभार व्यक्त करते असे सांगितले तर कोळब पंचायत समितीच्या पंचायत समिती सदस्य सौ योजना कांबळी यांनी असे आरोग्य मेळावे हे ग्रामस्थांना आणि रुग्णांना खऱ्या अर्थाने दिशादर्शक असतात. अशा मेळाव्यातून जे अति दुर्धर रुग्ण आढळतील त्यांनाही पुढील उपचार शासनाने मोफत करण्याच्या दृष्टीने योजना राबवाव्यात असे सांगितले
यानंतर विविध मान्यवरांनी या आरोग्य मेळाव्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी सर्व रुग्णांची तपासणी डॉक्टर वसीम वल्लिकापट्टा, डॉक्टर ब्लेसी जोसेफ, डॉक्टर पूजा, डॉक्टर भावनेश चव्हाण, डॉक्टर अखिल बेगडे, डॉक्टर श्रीमती आर्या कदम, डॉक्टर कृष्णा त्यागी, डॉक्टर विना मेहंदळे, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर प्रियांका पाटील यांनी केली. यामध्ये हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, नेत्ररोग, ईसीजी, वय वंदना, पी एम जे ए वाय कार्ड, एच एल एल टेस्ट, व्ही आय ए टेस्ट, एच पी व्ही लसीकरण, एन सी डी विभाग, जनरल फिजिशियन आधी विभागातील आरोग्यविषयक समस्या बाबत रुग्णांनी सहभाग नोंदवला. उपस्थित रुग्णांची तपासणी करून प्राथमिक स्वरूपातील औषधोपचारही पूर्णपणे मोफत करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यात २०५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी विनोद पारकर, एस जे कदम, सिद्धेश धुरी, दत्ता पिंगुळकर, कृष्णा माजिक, डॉक्टर प्रशांत पवार, भक्ती परब अंजली नेरुळकर प्राची परब, ईस्टर मोहिते, क्रांती तोरस्कर, प्राची पेडणेकर, वसुधा कदम, दिव्या पांजरी, संगीता सामंत, वारीजा हडकर, संगीता मयेकर, सायली पाटील, सौम्या बांदेकर, प्रथमेश वायंगणकर, क्रांती पारकर, रामचंद्र जोशी, नितीन घाडी, राकेश चव्हाण, पल्लवी नाचणकर आणि मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज बांगर यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री विनोद पारकर व शंकर कदम यांनी मानले.







