Sindhudurg Officers Association formed under the leadership of Collector Trupti Dhodmise; certificate handed over by Guardian Minister Nitesh Rane to promote welfare of officers and staff.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली असून, या संस्थेच्या गठनासंदर्भातील ठरावाचे प्रमाणपत्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारले.
ही असोसिएशन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपणे, तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी उपक्रम राबविणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांच्या समस्या मांडणे आणि त्यावर उपाययोजना करणे यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जिल्ह्याच्या विकासातही ही असोसिएशन योगदान देणार आहे.







